Delhi Blast CCTV Footage
नवी दिल्ली (MHDU News ) : देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ असलेल्या आय-20 कारमध्ये हा भीषण स्फोट झाला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले. स्फोटानंतर आग भडकली आणि परिसरातील अनेक वाहने जळून खाक झाली.
या स्फोटाआधीचे पहिले सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून त्यात काळा मास्क घातलेला एक व्यक्ती कारमध्ये बसलेला दिसतोय. तो व्यक्ती म्हणजेच दहशतवादी मोहम्मद उमर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे फुटेज तपासात एक महत्त्वाचा दुवा ठरू शकते.
फुटेजनुसार, एक पांढऱ्या रंगाची आय-20 कार गर्दीच्या वाहतुकीतून पुढे जाताना दिसते. चालकाने आपला चेहरा काळ्या मास्कने झाकलेला आहे. तपास यंत्रणा आता या कारचा मागोवा घेण्यासाठी आणि मास्कधारी व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक तपास करत आहेत.
🔹 ती गाडी कोणाची होती? (Delhi Blast CCTV Footage)
स्फोट झालेली कार मूळतः मोहम्मद सलमान या व्यक्तीची होती. त्याने ती ओखला येथील नदीमला विकली, त्यानंतर नदीमने ती रॉयल कार झोन (फरीदाबाद) या डीलरला दिली. नंतर तारिक या पुलवामाच्या रहिवाशाने ही कार विकत घेतली आणि पुढे मोहम्मद उमर याच्याकडे पोहोचली.
तपासात समोर आले आहे की, ही कार स्फोटकांनी भरलेली होती आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ जानूनबुजून उडवण्यात आली. त्यामुळे आता या घटनेची चौकशी संशयित दहशतवादी हल्ला म्हणून केली जात आहे.
🔹 संशयितांची नावे आणि तपासाची दिशा (Delhi Blast CCTV Footage)
या प्रकरणात दोन संशयितांची नावे समोर आली आहेत — मोहम्मद उमर आणि तारिक.
कार तारिकच्या नावावर होती आणि उमरने ती चालवत आत्मघाती हल्ला केल्याचा संशय आहे. स्फोटात उमरचाही मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
🔹 कारची माहिती (Delhi Blast CCTV Footage)
- ह्युंदाई कंपनीची i-20 कार स्फोटांसाठी वापरली
- मूळ मालक मोहम्मद सलमान – ओखला येथील रहिवासी
- नदीमने कार ‘रॉयल कार झोन’ ला विकली
- पुलवामाचा रहिवासी तारिकने ती विकत घेतली
- तारिकचा संबंध फरीदाबादमधील दहशतवादी मॉड्यूलशी असल्याचा संशय
- फरीदाबादमध्ये सापडलेल्या 2900 किलो स्फोटकांशीही तपास जोडला जात आहे
🔹 घटनेचा कालक्रम (Delhi Blast CCTV Footage)
तारीख: 10 नोव्हेंबर 2025
वेळ: सायं. 6:52 वाजता
ठिकाण: लाल किल्ला मेट्रो स्टेशन, गेट क्रमांक 1
परिणाम: 8 ते 10 वाहनं जळून खाक, परिसरातील काच फुटल्या
10 जण ठार, 24 जखमी
दिल्ली पोलिसांकडून UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
देशभरात हायअलर्ट जारी
सध्या दिल्ली पोलिस, एनआयए आणि केंद्रीय तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या स्फोटामागील सूत्रांचा आणि आर्थिक व्यवहारांचा शोध सुरू असून देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
MHDU News : Priya Borse ( MHDUTeam )


[…] स्फोटाआधीचा पहिला सीसीटीव्ही फुटेज स… […]
Jilioklogin, huh? Interesting name. Tried logging in and it was pretty straightforward. Got in, played a bit, and no complaints. Seems legit if you’re trying to get your game on. Give it a shot at jilioklogin
Looking to dive into some cockfighting action? Sv388 Login Juraganslot’s got ya covered. Just signed up and it’s pretty straightforward. Check out sv388 login juraganslot.