CM Fadnavis Drives EV Truck
पुणे : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहन उद्योगात एक मोठी क्रांती घडवणारी घटना गुरुवारी (१६ ऑक्टोबर) घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील चाकण येथील ब्लू एनर्जी मोटर्सच्या कारखान्याला भेट देत भारतातील पहिल्या स्वदेशी ईव्ही ट्रकचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतः हा ट्रक चालवून त्याच्या कार्यक्षमतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, (CM Fadnavis Drives EV Truck)
“ब्लू एनर्जीच्या वतीने भारतातील सर्वात आधुनिक आणि पहिला इलेक्ट्रिक ट्रक तयार करण्यात आला आहे. या ट्रकमध्ये बॅटरी स्वॅपिंग सिस्टम असून, फक्त 4.5 मिनिटांत बॅटरी बदलता येते. त्यामुळे ट्रक थांबवण्याची वेळ कमी होईल आणि वाहतुकीची कार्यक्षमता वाढेल.”
ते पुढे म्हणाले, (CM Fadnavis Drives EV Truck)
“हा ट्रक पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा आहे. भारतातील कोणत्याही हवामानात चालवता येईल असा हा ट्रक आहे. या उपक्रमामुळे प्रदूषण कमी होईल आणि परकीय चलनाची बचत होईल. हा उद्योग महाराष्ट्रातील ई-मोबिलिटी क्षेत्रासाठी नवा अध्याय ठरेल.”
पहिल्या टप्प्यात 10,000 ईव्ही ट्रकची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यानंतर 30,000 ट्रक निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
तसेच, मुंबई-पुणे दरम्यान ईव्ही कॉरिडॉर तयार करण्यात येत असून, ट्रक चालकांना या मार्गावर बॅटरी बदलणे आणि चार्जिंग सुविधा मिळणार आहे.
फडणवीसांनी सांगितले की, दावोस येथे झालेल्या एमओयूच्या माध्यमातून हा प्रकल्प साकार करण्यात आला आहे आणि आता तो प्रत्यक्षात उतरला आहे.
“ब्लू एनर्जी आणि एस.आर. कंपनीने ट्रक उद्योगात क्रांती घडवली आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
ही घटना भारताच्या ग्रीन एनर्जी आणि ई-मोबिलिटी युगाच्या सुरुवातीचा टप्पा ठरली आहे.
MHDU News : Vishal Bhdane CM Fadnavis Drives EV Truck
Nashik EV Hub : महाराष्ट्र लवकरच ‘ईव्ही हब’; नाशिकमध्ये सुरू होणार इलेक्ट्रिक वाहन चाचण्या – मुख्यमंत्र्यांची घोषणा
mhdunews #mhdusocial #MaharashtraNews #CMFadnavis #EVTruck #BlueEnergy #ElectricVehicle #Chakan #PuneNews #DevendraFadnavis #EVIndia #GreenEnergy #MHDU #NewsUpdate #LatestNews #EVRevolution


[…] […]
[…] […]
Alright, pk88betvn time to roll the dice! New place to test my luck, let’s see what happens. Check it out here: pk88betvn