Beed API affair caught red-handed by husband in carबीडमध्ये API रवींद्र शिंदे आणि विवाहितेला कारमध्ये पकडल्यावर संतप्त पतीने भर रस्त्यात केली चोपाई.

Beed Crime :

बीड शहरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. एका विवाहित महिलेला तिच्या प्रियकरासोबत कारमध्ये रंगेहाथ पकडल्यावर संतप्त पतीने भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (३ ऑक्टोबर) दुपारी २ वाजता बीड बसस्थानकाजवळ घडली. प्रियकर हा दुसरा-तिसरा कोणी नसून पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक (API) रवींद्र शिंदे असल्याने या घटनेवरून पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

२०१३ साली बीड पोलिस दलात उपनिरीक्षक म्हणून भरती झालेल्या रवींद्र शिंदे यांची पीडित महिलेशी ओळख शेजारी राहण्याच्या निमित्ताने झाली. त्यानंतर त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला. बदली धाराशिवला झाल्यानंतरही त्याने त्रास देणे थांबवले नाही. पिस्तूलाचा धाक दाखवून जून-जुलै २०२५ मध्ये घरात घुसून अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने केली होती. एवढेच नाही, तर पीडिता गर्भवती राहिल्याचाही खुलासा झाला. या प्रकरणात शिंदेविरोधात गुन्हा दाखल असून तो अद्याप फरार आहे.

घटना कशी घडली? (Beed Crime)
शुक्रवारी दुपारी पीडिता आणि शिंदे हे कार (एमएच २३ बीसी ३४०२) घेऊन भाग्य नगर परिसरात फिरत होते. त्याचवेळी पतीने दोघांना पाहून पाठलाग केला. तुळजाई चौक, नगर नाका आणि बसस्थानक मार्गे बाहेर जाण्याआधीच पतीने दुचाकी कारसमोर लावली आणि शिंदेला खाली खेचले. संतप्त अवस्थेत त्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. पीडिता कारमध्येच तोंड बांधून बसलेली होती, तर शिंदेचेही तोंड बांधलेले होते. त्यानंतर पतीने थेट शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

फरारी असूनही शिंदे बिनधास्त फिरतो (Beed Crime)
शिंदेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असून तो फरार असतानाही बीडमध्ये फिरत होता. शुक्रवारीही पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीला अटक करण्याऐवजी त्याला अभय दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी “तो आरोपी असल्याचे आम्हाला माहीत नव्हते” असे सांगत जबाब चुकवला.

पीडिता तीन दिवसांपासून गायब (Beed Crime)
तीन दिवसांपासून पीडिता घरी परतली नव्हती, यामुळे पतीला संशय आला होता. अखेर शुक्रवारी तो खरा ठरला. मात्र पोलिस ठाण्यात तक्रार देताना पीडितेने पतीवरच आरोप केले, तरी पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेऊन शिंदेविरोधातच गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असूनही शिंदे बिनधास्त फिरत आहे आणि पोलिस त्याच्यावर कारवाई करत नाहीत. त्यामुळे पोलिस यंत्रणेच्या निष्क्रियतेवर आणि आरोपींना दिल्या जाणाऱ्या अभयावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नवीन ताज्या घडामोडी 👇: Beed Crime: पत्नी 3 दिवसापासून गायब प्रियकर API सोबत कारमध्ये रंगेहाथ पकडली, संतप्त पतीने भर रस्त्यात केली चोपाई

मित्रानेच केली पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या; बीड हादरलं!

धुळे हादरलं! 3 वर्षीय चिमुकलीवर काकाचा बलात्कार 😡💔 — जनतेची संतापजनक मागणी: “फाशीच हवी!”

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

2 thoughts on “Beed Crime: पत्नी 3 दिवसापासून गायब प्रियकर API सोबत कारमध्ये रंगेहाथ पकडली, संतप्त पतीने भर रस्त्यात केली चोपाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *