BJP leader Sunil Bagul’s nephew Ajay Bagul arrested in Nashik crime caseभाजप नेते सुनील बागूल यांच्या पुतण्याला पोलिसांनी अटक केली असून नाशिक पोलिसांच्या या कारवाईचं नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Ajay Bagul Arrested –

नाशिक : गंगापूरच्या विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजप नेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांचा पुतण्या अजय बागूल (Ajay Bagul Arrested) याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पप्पू जाधव आणि एका अन्य आरोपीला देखील ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी यापूर्वी मामा वाल्मिक उर्फ बाबासाहेब राजवाडे (Mama Rajwade) आणि अमोल पाटील या दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरीसा हे अद्यापही फरार आहेत.

29 सप्टेंबर रोजी विसे मळा परिसरात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत सचिन साळुंखे या तरुणावर गोळ्या झाडत मारहाण करण्यात आली होती.
सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर तपासादरम्यान अजय बागुलचं नाव समोर आलं.

त्यानंतर पोलिसांनी 9 ऑक्टोबर रोजी मामा राजवाडे यांची चौकशी करून 10 ऑक्टोबर रोजी अटक केली.
आज, 12 ऑक्टोबर 2025 रोजी, पोलिसांनी अजय बागुल, पप्पू जाधव आणि सचिन कुमावत यांना ताब्यात घेतलं आहे.

अटकेनंतर आरोपींना घेऊन जाताना नागरिकांकडून पोलिसांना दिला उत्स्फूर्त प्रतिसाद —
“नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला!” अशी घोषणा देत नागरिकांनी नाशिक पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलं.

दरम्यान, ‘ऑरा बार’ गोळीबार प्रकरणातील आरोपी भूषण लोंढे हा अद्याप फरार असून, पोलिसांनी त्याने वापरलेली वाहने आणि संबंधित साहित्य जप्त केलं आहे. प्राथमिक तपासात या गोळीबाराचा उद्देश खंडणी आणि कब्जा वाढवण्याशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे.

नाशिक पोलिसांकडून सलग सुरू असलेल्या या कारवाईंमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होत असल्याचं नागरिकांचे मत आहे.

Ajay Bagul Arrested

Nashik Crime: Secret Bunker Found in RPI Leader Prakash Londe’s Office – आरपीआय नेत्याच्या कार्यालयात सापडलं गुप्त भुयारघर

MHDUnews #MHDUsocial #NashikCrime #AjayBagul #SunilBagul #NashikPolice #BreakingNews #CrimeNews #NashikUpdate #Maharashtra #PoliceAction #MHDUexclusive

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

One thought on “Nashik Crime: BJP Leader Sunil Bagul’s Nephew Ajay Bagul Arrested – भाजप नेते सुनील बागूल यांच्या पुतण्याला अटक सोबत 2 जण अटकेत ; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *