Nashik Central Jail Drugs Scandal
नाशिक जिल्ह्यामधील सेंट्रल कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारागृहातील काही सराईत गुन्हेगारांचे फोटो आणि अंमली पदार्थांचे सेवन करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर नाशिक सेंट्रल जेलच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Nashik Central Jail Drugs Scandal)
कारागृह अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही नाशिक सेंट्रल जेलमधून अनेकवेळा मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तरीही, चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त असतानाही मोबाईल आणि अंमली पदार्थ जेलच्या आत कसे गेले, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या फोटो आणि व्हिडिओंवरून जेलमधील काही गुन्हेगारांना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नाशिकच्या कारागृहात महाराष्ट्रभरातील अनेक जिल्ह्यांमधील कुख्यात गुन्हेगार ठेवले गेले आहेत, ज्यामध्ये मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या टोळ्यांचा समावेश आहे.(Nashik Central Jail Drugs Scandal)
स्रोतांच्या माहितीनुसार, काही अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध जोडून या गुन्हेगारांना विशेष सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. चांगले जेवण, आरोग्याच्या कारणावरून जिल्हा रुग्णालयात दाखल होणे, मोबाईल वापरणे, अंमली पदार्थ व चैनीच्या वस्तूंचा पुरवठा अशा सुविधा काही कैद्यांना दिल्या जात असल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये असतानाच हे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत, “जेलमध्ये मोबाईल आणि अंमली पदार्थ कसे गेले याची सखोल चौकशी होणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे नाशिक सेंट्रल जेलच्या सुरक्षेतील त्रुटी पुन्हा एकदा उघडकीस आल्या आहेत. कारागृहातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. व्हायरल झालेले व्हिडिओ कारागृहाच्या आतील विविध ठिकाणी चित्रीत केलेले असून, हे गुन्हेगार पुण्यातील आणि मोक्क्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या नाशिकच्या कारागृह व्यवस्थेवर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. प्रशासन आता यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
MHDU News : Vishal Bhadane Nashik Central Jail Drugs Scandal
RPI Leader Prakash Londhe Illegal Empire Crushed! | आरपीआय नेता प्रकाश लोंढेच्या अनधिकृत साम्राज्यावर मनपा व पोलिसांची संयुक्त कारवाई
नाशिक #Nashik #NashikNews #NashikJail #NashikCentralJail #ViralVideo #GirishMahajan #CrimeNews #MaharashtraNews #MHDU #MHDUnews #mhdusocial


[…] […]
[…] […]
Bong88comcom, my go-to for Asian handicap betting! Always find good odds here. Check it out bong88comcom