Man helps deliver baby in Mumbai local
मुंबई : मुंबईच्या धावत्या लोकल ट्रेनमध्ये घडलेली ही घटना खऱ्या अर्थाने माणुसकीचा आदर्श ठरली आहे. गोरेगाव रेल्वे स्थानकावरून लोकलने प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला प्रवासादरम्यान अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी आरडाओरडा करू लागली, परंतु डब्यातील प्रवाशांपैकी कोणीही तिला मदत करण्यास पुढे आले नाही. (Man helps deliver baby in Mumbai local)
त्याच वेळी डब्यात प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे हा तरुण तिच्या मदतीसाठी पुढे सरसावला. त्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ ट्रेनची इमर्जन्सी चैन ओढली आणि लोकल राम मंदिर रेल्वे स्थानकावर थांबवली.
स्थानकावर कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना, विकासने लगेचच आपल्या डॉक्टर मैत्रिणी डॉ. देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. मध्यरात्रीचा वेळ असूनही डॉ. देविका यांनी तात्काळ प्रतिसाद देत प्रसूती प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप समजावून सांगितली. वैद्यकीय शिक्षण नसतानाही विकासने अत्यंत संयम आणि धैर्य दाखवत प्रत्येक सूचना काळजीपूर्वक पाळली.
त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि काही वेळातच राम मंदिर स्टेशनवर गोंडस बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला.
महिलेने एका मुलीला जन्म दिला आणि उपस्थित सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. (Man helps deliver baby in Mumbai local)
घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने आई आणि बाळाला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवले असून दोघांचीही प्रकृती सध्या सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.
ही घटना केवळ मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात खऱ्या माणुसकीचा धडा शिकवणारी घटना ठरली आहे. 🙏
MHDU News : Vishal Bhadane Man helps deliver baby in Mumbai local
ST Bank Rada Mumbai : एसटी बँकेच्या बैठकीत सदावर्ते गट आणि शिवसेना 2 गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
mhdunews #mhdusocial #MumbaiNews #VikasBedre #DevikaDeshmukh #ManHelpsDeliverBaby #RamMandirStation #MumbaiLocal #Humanity #LocalTrainStory #InspiringStory #MaharashtraNews #ViralStory #MHDU


Hey football fans, I saw 188bet88betbongda. I had to take a shot, seems great. Give it a spin. 188bet88betbongda.