Rohit Sharma and Virat Kohli depart for Australia ODI Series with Team Indiaरोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना; टीम इंडियाच्या पहिल्या तुकडीत मोठे खेळाडू सहभागी

Rohit Sharma Virat Kohli Fly Australia ODI Team India

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना (Rohit Sharma Virat Kohli Fly Australia ODI Team India) झाले आहेत. ऑस्ट्रेलियात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 19 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होणार आहे.

या मालिकेत दोघांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन होणार असून, त्यांनी यंदा टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे. मार्च 2025 मध्ये झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर प्रथमच दोघे भारतीय जर्सीमध्ये दिसणार आहेत.

यावेळी मात्र ना रोहित कप्तान आहे, ना कोहली. भारतीय संघाचे नेतृत्व तरुण शुभमन गिल करणार असून, संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आहेत. अनुभवी रोहित आणि कोहली यांच्या पुनरागमनाने संघाला मोठा आत्मविश्वास मिळणार असल्याचे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची पहिली तुकडी रवाना झाली आहे. या तुकडीत विराट कोहली, उपकर्णधार श्रेयस अय्यर, माजी कर्णधार रोहित शर्मा, कर्णधार शुभमन गिल, के.एल. राहुल, यशस्वी जयसवाल, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शुभ पुरैल आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे.

यावेळी मात्र गौतम गंभीर टीम इंडियाच्या पहिल्या तुकडीसोबत दिसला नाही. पण, हर्षित राणा पहिल्या तुकडीसोबत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

BCCI ने स्पष्ट केले आहे की, ही मालिका त्यांच्या ODI करिअरचा शेवट नाही. 2027 विश्वचषकापर्यंत अजून अनेक एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

शुभमन गिल म्हणाला,

“रोहित आणि विराट दोघांनी गेल्या 10-15 वर्षांत संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. त्यांचा अनुभव आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही फक्त अपेक्षा करतो की ते मैदानावर जाऊन त्यांचे जादू दाखवतील.”

भारतीय संघाने बुधवारी (15 ऑक्टोबर) दिल्लीहून ऑस्ट्रेलियासाठी उड्डाण केले असून, रोहित आणि विराट दोघेही भारताच्या रंगात सजलेले दिसले. दोघांचे पुनरागमन पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

MHDU News : Vishal Bhdane Rohit Sharma Virat Kohli Fly Australia ODI Team India

Rohit Sharma Virat Kohli Fly Australia ODI Team India

Full Fuel Tank Danger! गाडीची टाकी फुल्ल भरणं ठरू शकतं धोकादायक – जाणून घ्या कारण

RohitSharma #ViratKohli #ShubmanGill #TeamIndia #CricketNews #AustraliaTour #BCCI #HarshitRana #GautamGambhir #ODISeries #mhduin #MHDUnews #mhdusocial

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

One thought on “Rohit Sharma Virat Kohli Fly Australia ODI Team India | रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना; टीम इंडियासोबत 1 दिवसीय मालिकेसाठी प्रयाण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *