Nashik Traffic CCTV System
Nashik शहरात वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने मोठा बदल घडवून आणण्यात आला आहे. पोलिस आयुक्त Sandeep Karnik यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ४० महत्त्वाच्या सिग्नल चौकांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. २० फेब्रुवारीपासून ही यंत्रणा अधिकृतपणे सुरू झाली आहे. (Nashik Traffic CCTV System)
या नव्या प्रणालीमुळे सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट प्रवास, राँग साइडने वाहन चालविणे, स्टॉप लाईन ओलांडणे यांसारख्या वाहतूक नियमांचे उल्लंघन थेट कॅमेऱ्यात नोंदवले जाणार आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनाचा क्रमांक ओळखून संबंधित वाहनमालकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ई-चलन पाठवले जाईल. (Nashik Traffic CCTV System)
यामुळे पोलिसांच्या प्रत्यक्ष हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलित दंडात्मक प्रक्रिया राबवली जाणार आहे. पारदर्शकता आणि शिस्त या दोन्ही गोष्टींना चालना देणारी ही प्रणाली शहरासाठी महत्त्वाची ठरणार आहे. (Nashik Traffic CCTV System)
ठराविक कालावधीत दंड न भरल्यास वाहनधारकांना आरटीओशी संबंधित व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. वाहन हस्तांतरण, खरेदी-विक्री किंवा ना हरकत प्रमाणपत्र मिळवताना दंड बाकी असल्यास प्रक्रिया अडवली जाऊ शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. (Nashik Traffic CCTV System)
सीबीएस, मेहेर सिग्नल, जुना गंगापूर नाका, शरणपूर चौकी, त्र्यंबक नाका, कॅनडा कॉर्नर, मुंबई नाका सर्कल, पेठ नाका, मखमलाबाद नाका, तारवाला चौक, आयटीआय चौक, बिटको चौक, सिन्नर फाटा, दत्त मंदिर यांसह एकूण ४० चौकांवर ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.
वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर अपघात रोखणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि नियमपालनाची सवय निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. (Nashik Traffic CCTV System)
शहराच्या रस्त्यांवर आता कॅमेऱ्यांची नजर; नियम पाळणे हाच एकमेव पर्याय ठरणार आहे.
MHDU News : Vishal Bhadane

अपक्ष उमेदवारी भोवली; भाजपकडून मुकेश शहाणे यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी
Nashik Traffic CCTV System
A major shift in traffic enforcement has begun in Nashik. Under the leadership of Police Commissioner Sandeep Karnik, an advanced CCTV-based monitoring system has been activated at 40 key traffic junctions across the city from February 20.
The system will automatically detect violations such as signal jumping, triple riding, wrong-side driving, and crossing stop lines. Once a violation is recorded, an e-challan will be issued directly to the registered mobile number of the vehicle owner.
This automated enforcement aims to ensure transparency and eliminate the need for physical interception by traffic police in many cases.
Authorities have clarified that failure to pay fines within the stipulated period may result in complications related to RTO services, including vehicle transfer, sale, and issuance of No Objection Certificates (NOC).
Key junctions covered under the system include CBS, Meher Signal, Old Gangapur Naka, Sharanpur Chowki, Trimbak Naka, Canada Corner, Mumbai Naka Circle, Peth Naka, Makhmalabad Naka, Tarwala Chowk, ITI Chowk, Bitco Chowk, Sinnar Phata, and Datt Mandir among others.
The initiative is expected to improve road safety, regulate increasing traffic volume, and strengthen compliance with traffic laws.

