Dharmendra Passes Away at 89
बॉलीवूडच्या सुवर्णकाळातील दिग्गज नाव… प्रेक्षकांच्या हृदयात घर करणारे अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळत होती आणि उपचार सुरु होते.
देओल कुटुंबाने काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी हलवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आज अखेर त्यांची जीवनयात्रा संपली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड आणि देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबईतील जुहू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार असून कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. (Dharmendra Passes Away at 89)
धर्मेंद्र यांनी सहा दशकांच्या कारकिर्दीत शंभराहून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. ‘शोले’मधील वीरू, ‘बर्निंग ट्रेन’, ‘आग ही आग’, ‘धर्म और कानून’, ‘जीने नही दुंगा’ अशा अनेक अविस्मरणीय भूमिका त्यांनी साकारल्या. त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना बॉलीवूडचा ही-मॅन अशी ओळख मिळाली. (Dharmendra Passes Away at 89)
अलीकडे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात त्यांनी पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली होती. (Dharmendra Passes Away at 89)
आणि आता त्यांचा आगामी सिनेमा ‘इक्कीस’ डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
धर्मेंद्र यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतील एक मोठा आधारस्तंभ कोसळला आहे.
MHDU News : Vishal Bhadane
गिरिजा ओक यांचा ट्रेंड… आनंदापासून अस्वस्थतेपर्यंत! AI, प्रायव्हसी आणि माणुसकीवर मोठा प्रश्न


AAABET77, not gonna lie, it’s pretty slick. The interface is clean and they’ve got a good range of games. Had a few wins here so I’m happy! aaabet77
I bumped into 88clb8gq com lately.. and I am actually digging it. Give it a shot if you’re after something new.