Rohit Arya Powai Hostage
मुंबईत पवई परिसरातील आर ए स्टुडिओमध्ये घडलेली थरारक घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. अभिनयाच्या नावाखाली १५ ते २० मुलांना गेल्या सहा दिवसांपासून डांबून ठेवण्यात आले होते. दुपारी मुले जेवणासाठी बाहेर आली नाहीत तेव्हा स्थानिकांना संशय आला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलीस आणि NSG कमांडो तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने आणि पोलिसांच्या तत्परतेने सर्व मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली. आरोपी रोहित आर्या याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो सध्या चौकशीत आहे.
रोहित आर्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून स्वतःच कबुली दिली की त्यानेच मुलांना ओलीस ठेवले आहे. त्याने म्हटले की, “मी आत्महत्या करण्याऐवजी हे पाऊल उचलले आहे. माझ्या काही मॉरल आणि एथिकल मागण्या आहेत. मला काही लोकांशी संवाद साधायचा आहे, प्रश्न विचारायचे आहेत. मी ना दहशतवादी आहे, ना मला पैशांची मागणी आहे.”
त्याने पुढे सांगितले की, “मी उपोषणावर आहे, आता पाणी सुद्धा घेणार नाही. जर मला प्रवृत्त केलं, तर हे ठिकाण जाळून टाकेन. मी मरेन की नाही माहिती नाही, पण मुलांना त्रास होईल.” (Rohit Arya Powai Hostage)
ही घटना उघड झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. सुदैवाने, पोलिसांच्या वेळेवर कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. (Rohit Arya Powai Hostage)
घटनेमागचे नेमके कारण आणि रोहित आर्याच्या मागण्या काय आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
MHDU News : Vishal Bhdane Rohit Arya Powai Hostage
mhdunews #mhdusocial #MumbaiNews #PowaiNews #RohitAryaCase #BreakingStory #MHDUUpdates #ViralNews


[…] […]
[…] […]
Just giving bet188vina a quick shoutout. Layout seems pretty good, easy on the eyes. Check it out at bet188vina
Yo, 28win! Been playing here for a bit, and it’s pretty solid. Easy to navigate, and I’ve had a few decent wins. Check it out! 28win